Home क्राईम विषारी औषध घेतल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

विषारी औषध घेतल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या तरूणाने विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान बुधवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दुदैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजय अरूण पाटील वय २५ रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात अजय पाटील हा तरूण वास्तव्याला होता. मंगळवारी २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास गोदावरील इंजिनिअरींग कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अजय पाटील हा विषारी औषध घेवून पडलेला होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उचलून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याने विषारी औषध का सेवन केले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी हे करीत आहे.


Protected Content

Play sound