जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील चौगुले प्लॉट येथील रेल्वेलाईन जवळ एमएससीबीचा विजेच्या तारांच्या धक्क्याने लागल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगेश रघुनाथ डोंगर (वय 21 रा. गवळीवाडा, तांबापुरा) अशी मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा भागातील गवळी वाडा या परिसरात योगेश हा आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होता. बांधकामाचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. चौगुले प्लॉट जवळील लेंडी नाल्या जवळून जात असताना रेल्वे लाईनचा कच्चा रस्त्यावर असलेल्या एमएसईबीच्या खांब्यावरील तुटलेल्या तारेला त्याचा स्पर्श त्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या संदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात पृथ्वीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन लहान बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष केल्याने परिवारात दुःख चा डोंगर कोसळला आहे.