Home क्राईम भीषण अपघातात तरूणाचा दुदैवी मृत्यू ; गुन्हा दाखल

भीषण अपघातात तरूणाचा दुदैवी मृत्यू ; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ महामार्गावर गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समाधान बापू भोई (वय ३२, रा. भालगाव बु. ता. एरंडोल) असे या मृत तरुणाचे नाव असून, ते व्यवसायाने फळ विक्रेते होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास समाधान भोई हे आरोपी अतुल भगवान पाटील (रा. जळगाव) याच्यासोबत होंडा शाईन (क्र. MH 48 A 9880) या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत होते. महामार्गावरील हॉटेल मधुबन समोरून जात असताना चालक अतुल पाटील याने आपली दुचाकी भरधाव वेगात आणि हलगर्जीपणे चालवली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुचाकी अचानक घसरली.

या भीषण अपघातात समाधान भाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सागर बापू भोई (वय २८, रा. भालगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.


Protected Content

Play sound