जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावरून घरी येत असतांना दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळल्याने २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे. याबाबत तालुका पोलीसात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
राहूल सिध्दार्थ सोनवणे (वय-२३) रा. फुफनगरी ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल सोनवणे हा वडील, मोठा भाऊ आणि बहिण यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. राहूल हा मंगळवारी ५ जुलै रोजी कानळदा येथे कामावर गेला होता. काम आटोपून दुचाकीने घरी परतत असतांना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी समोरील इलेक्ट्रीक पोलवर आदळली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरीन नागरीकांनी धाव घेवून त्याला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत असतांना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्र परिवारांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. याबाबत रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मयत राहुलच्या पश्चात वडील, मोठा भाऊ धनराज आणि बहिण पुजा असा परिवार आहे.