बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील हरणखेड येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून आणि पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, बोदवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रविण सोपान घोके (वय ३५ वर्षे, रा. हरणखेड, ता. बोदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घटनेबाबत प्रविण यांचे मावस भाऊ यांनी बोदवड पोलीस ठाण्यात खबर दिली. दिलेल्या खबरीनुसार, प्रविण हे हरणखेड शिवारातील एका विहिरीत पडले आणि पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक सुरवाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रविण घोके यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळेच झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप झरवाल हे करीत आहे.




