जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटजवळ रेल्वेखाली येवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज (दि.11) सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या करणारा तरुण जळगावचे प्रातांधिकारी यांच्या वाहनचालकांचा मुलगा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश सुरेश जाधव (वय-२३ रा.आशाबाबा नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने रेल्वे स्टेशन (केएमएनओ-418/11) डाऊनलाईन जळगाव येथे राजधानी एक्सप्रेस समोर येवून आत्महत्या केली आहे. ही घटना दि.10 जानेवारी रोजी 9 वाजून 25 मिनिटांनी घडली असून आधारकार्ड व मोबाईल नंबरवरुन तरुणाची ओळख पटली आहे. या घटनेबाबत अधिक तपास हे हे.कॉ. अनिल नगराळे व पो.कॉ. योगेश अडकणे करत आहेत.