जुने जळगावात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुने जळगाव परिसरातील तेली चौकातील तरुणाने दाराच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुने जळगावातील तेली चौकातील रहिवासी विजय नामदेव खडके (वय-३१) या तरुण रेमंड कंपनीत नोकरीस होता. गेल्या काही वर्षांपुर्वी आजारपणामुळे त्याच्या आई वडीलाचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच घरात वास्तव्यास होता. आज सकाळच्या सुमारास विजय याने घराच्या दरवाज्याच्यावर असलेल्या खिडकीला दोरीच्या गळङ्गास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी, राहुल घेटे, परिस जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.

विजय हा घरात एकटाच राहत होता. तसेच तो रेमंड कंपनीत नोकरीस असून त्याचा स्वभाव हा मनमिळावू होता. घराकडे देखील तो कोणाच्या अधिक संपर्कात नसल्याने त्याने गळङ्गास घेतल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, विजयचा मृतदेह संशयास्पद असल्याने अनेकांनी घातपाताचा संयश देखील व्यक्त केला आहे.त्याच्या पश्‍चात तीन बहिणी आहेत.

 

Protected Content