जळगावात रेल्वे रुळावर झोपून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील असोदा रेल्वेगेट परिसरात तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. तरुणाची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन शनिपेठ पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याबाबत माहिती रेल्वे स्टेशन मास्तरकडून शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पोलीस नाईक अमित बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठले. तरुणाच्या शरीराचे मधोमध दोन तुकडे झालेले होते. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. प्रमोद पाटील व अमित बाविस्कर यांनी पंचनामा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या खिशात पाकिट सापडले आहे. मात्र त्यात फक्त तरुणाचे स्वतःचे पासपोर्ट फोटो मिळून आले. कुठलेही ओळखपत्र नाही, किंवा कुणाचा संपर्क क्रमांक त्यात मिळाला नाही. पाकिट तसेच तरुणाची चप्पल व रुमाल या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  त्याव्दारे पोलिसांनी परिसरात जावून मयत तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र उशीरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content