हरीविठ्ठल नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरातील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल विठ्ठल हिरे (वय-३०) रा. हरी विठ्ठल नगर असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील अनिल हिरे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घरात कुणीही नसतांना घर बंद करून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान ही पत्नी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. पतीने आत्महत्या केल्याचे पाहून पत्नीने हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेजारील नागरीकांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विजय खैरे करीत आहे.

 

 

Protected Content