Home क्राईम वाहनाचा कट लागल्यावरून तरूणाला बेदम मारहाण !

वाहनाचा कट लागल्यावरून तरूणाला बेदम मारहाण !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाहनाचा कट मारल्याचा जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या किरकोळ वादातून चिडलेल्या तरूणाला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना चोपडा रोडवरील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण भीमराव सोनवणे (वय १९, रा. वढोडा, ता. यावल) हे आपल्या वाहनाने १६ मार्च रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास जात असताना एकाने त्याच्या दुचाकीला कट मारला. यावेळी किरण यांनी ‘नीट गाडी चालव’ असे म्हणत कट मारल्याचा जाब विचारला. याचा राग मनात धरून हेमराज घारू रा. श्रीराम नगर, यावल याने किरण सोनवणे यांना भररस्त्यात गाठले. आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच धमकीही दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हेमराज घारू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित तडवी हे करीत आहे.


Protected Content

Play sound