जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाला जुन्या भांडण्याच्या कारणावरून तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 12 मार्च रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी 13 मार्च रोजी मध्यरात्री 1 वाजता तीन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश उर्फ चीच्या कृष्णा शिंदे (वय 23 रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून १२ मार्च रोजी रात्री ८ वाजता राहणार रामेश्वर कॉलनी येथील चौकात उभा होता. त्यावेळी जुन्या वादातून रितिक, मॉडेल आणि बिल्डर तिघांचे (पूर्ण नाव माहित नाही) रा. रामेश्वर कॉलनी या तीन जणांनी शिवीगाळ करून त्याला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले आहे. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत रितेश शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार गुरुवारी 13 मार्च रोजी रात्री 1 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिस्थिती संदीप पाटील हे करीत आहेत.

Protected Content