Home Cities जळगाव भोकरबारी येथे भिंत पडल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

भोकरबारी येथे भिंत पडल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
27


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोकरबारी येथे एकाला घराची भिंत पडल्याच्या कारणावरून ११ जणांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नरेश युवराज पाटील (वय-३२) रा. भोकरबारी ता. पारोळा हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी नरेश पाटील हे आईसोबत घरात असतांना शेजारी राहणारे विनोद बापू पाटील, विकास बापू पाटील, केवल बापू पाटील, भुषण विनोद पाटील, आशु विकास पाटील, दिपक केवल पाटील, उषा विनोद पाटील, छाया केवल पाटील, वैशाली विकास पाटील, सुरूबाई बापू पाटील आणि मनिषा नरेश पाटील सर्व रा. भोकरबारी ता .पारोळा यांनी घराची भिंत का पाडली या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. यातील विकास पाटील याने नरेश पाटील याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले तर विषारी औषध आणून पाजण्याच्या प्रयत्न केला. यात गल्लीतील नागरीकांना सोडवासोडव केली. याप्रकरण नरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहे.

 


Protected Content

Play sound