जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील हनुमान मंदीराजवळील भवानी नगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील हनुमान मंदिरा जवळील भवानी नगरात शंकर प्रल्हाद जोहरे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी ६ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शंकर जोहरे याला मागील भांडणाच्या कारणावरून गावातील चंद्रकांत मंगा रंधे, अर्जुन चंद्रकांत रांधे, कमलाकर रामकृष्ण रंधे, पांडुरंग मंगा रंधे आणि गोकुळ पांडुरंग रंधे सर्व रा. भवानी नगर जळगाव यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले तसेच अश्लिल शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या शंकर जोहरे याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात शंकर जोहरे यांचे प्रल्हाद गिरधर जोहरे यांनी रात्री नशिबराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात चंद्रकांत मंगा रंधे, अर्जुन चंद्रकांत रांधे, कमलाकर रामकृष्ण रंधे, पांडुरंग मंगा रंधे आणि गोकुळ पांडुरंग रंधे सर्व रा. भवानी नगर जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.