जामनेर (प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील मोयखेड़ा दिगर येथील तरुण शेतकार्याने गावाजवळील शेतात घळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
जामनेर तालुक्यातील मोयखेड़ा येथील तरूण शेतकरी तसेच घरातील कर्ता-पुरुष अनिल काशीनाथ सपकाळे (वय 27) हे सोमवार दि 10 रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घरातुन निघुन गेले होते रात्री पासून त्याचा मोठा भाऊ रवि सपकाळे यानी शोध घेतला गावात व परिसरात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावाजवळील सुशीलाबाई सुरवाड़े यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवसतेत मिळून आला. यावेळी घरातील मंडळींना माहिती मिळाल्यानंतर नातलग यांनी त्यांना जामनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अनिल मयत झाल्याचे घोषीत केले. मयत अनिल सपकाळे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मोठा भाऊ असा परिवार आहे. मयत अनिल याच्या नावे बँकेचे 1लाख 40 हजार रु कर्ज असल्याने कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने व कर्जबाजरीपणामुळे आत्महत्या केली असल्याची माहिती उपस्थित नातलगांनी दिली.