Home करियर युवा उद्योजक विशाल अग्रवाल कृषी पुरस्काराने सन्मानित

युवा उद्योजक विशाल अग्रवाल कृषी पुरस्काराने सन्मानित


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा उद्योजक विशाल अग्रवाल यांचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर २०२६’ कृषी पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी उत्पादनाचे दर्जा वाढला आहे, विशेषतः केळी उत्पादनामध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला आहे.

मुंबई येथे गेटवे ऑफ इंडियामध्ये आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, अभिनेते विकी कौशल आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात शेतकरी, उद्योजक आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

विशाल अग्रवाल यांनी शेतीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले असून, त्यांची उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेसोबतच आखाती देशांमध्येही निर्यात केली जातात. यामुळे रावेर परिसरातील केळी उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यास मोठा हातभार लागला आहे.

शिवाय, विशाल अग्रवाल यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित एक कंपनी स्थापन केली आहे, ज्याद्वारे रावेर परिसरातील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. आधुनिक शेती पद्धती आणि निर्यातक्षम उत्पादनामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कृषी श्रेणीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यास त्यांच्या कुटुंबियांसह रश्मी अग्रवाल, वरुण अग्रवाल उपस्थित होते. रावेर नगराध्यक्ष संगिता महाजन, कृषीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशाल अग्रवाल यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले.


Protected Content

Play sound