भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाला नवे नेतृत्व लाभले असून योजनाताई पाटील यांची भडगाव मंडल अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल घेत पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
भाजपाच्या जळगाव पश्चिम भडगाव मंडळ कार्यकारिणीची ही निवड माननीय मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. नामदार गिरीशजी महाजन, महामंत्री राजेशजी पांडे, प्रभारी रविंद्रजी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी यांच्या मान्यतेने भडगाव मंडल अध्यक्ष विनोद नेरकर यांनी योजनाताई पाटील यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

योजनाताई पाटील यांचे भडगाव शहर व तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान राहिले आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली असून स्थानिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे.
योजनाताई यांनी भडगाव नगरपरिषद, शेतकरी सहकारी संघ, महिला दक्षता समिती, संजय गांधी निराधार योजना, पिपल्स बँक, तनिष्का यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान तसेच दामिनी महिला संघ अशा विविध संस्थांमध्ये प्रमुख पदांवर काम करत यशस्वी सेवा बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे महिला मोर्चाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, निर्मल सिड्स संचालिका वैशालीताई सूर्यवंशी, युवा नेते अमोल भाऊ शिंदे, किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



