राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी योगेश देसले यांची निवड


download 2

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात विभाग निहाय प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात जळगाव खान्देश विभागासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांची प्रवक्ते म्हणून निवड घोषित करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीव्ही चॅनेल्सवरील डिबेट व वर्तमानपत्रातील चर्चासत्रासाठी प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुणे,ठाणे,औरंगाबाद,अकोला,नाशिक,बीड,सोलापूर,उसमानाबाद,नागपूर,रत्नागिरी व जळगाव अशा अकरा विभागनिहाय प्रवक्ते नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात जळगाव खान्देश विभागासाठी प्रदेश प्रवक्ते म्हणून योगेश देसले यांना संधी मिळाली आहे. श्री.देसले यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here