यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील राम मंदिर विश्वस्त समितीच्यावतीने ८ ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी १० दिवसीय योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१ जून पासून ते १० जुन पर्यंत दहा दिवसापर्यंत आयोजीत करण्यात आलेल्या या योग प्राणायमा शिबीराचे सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत राम मंदीर किनगाव येथील वरील हॉल मध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या काळात या योग प्राणायम शिबीराचे नियमीत आयोजन करण्यात येणार असल्याचे राममंदीर विश्वस्त मंडळाच्या वतीने विश्वस्तांनी म्हटले आहे. याबाबत योग प्राणायमची आवड असलेल्यांनी राममंदीर विश्वस्त समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच विश्वस्त समितीच्या वतीने दि.२१ जुन रोजी योग दिवसही साजरा करण्यासह नियमीत प्राणायाम करण्याचा मानस राम मंदीर विश्वस्त समीतीचा आहे. या शिबिरात इंद्रदेवजी महाराज योग समिती जळगावचे इंन्द्रराव पाटील, मनोहर पाटील, वसंतराव पाटील, भारतीताई, निताताई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या योग प्राणायम कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मंदीर विश्वस्त समितीचे अध्यक्ष करमचंद गेंदा पाटील(के.जी.अण्णा), धांडे वायरमन, रवि पाटील, भिवसन पाटील इ.सह केमीस्ट परिवार किनगाव हे परिश्रम घेत आहेत.