Home Cities जामनेर योग गुरू बाबा रामदेव गोद्री येथे दाखल

योग गुरू बाबा रामदेव गोद्री येथे दाखल


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोद्री येथे भरलेल्या बंजारा, लबाणा-नायकडा समाज महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमासाठी योग गुरू बाबा रामदेव हे दाखल झाले आहेत.

आज गोद्री येथील महाकुंभाचा समारोप होत असून विविध मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला जमणार आहे. यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींचा समावेश आहे. यात योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

बाबा रामदेव यांचे साडेबारा वाजेच्या सुमारास गोद्री येथील हेलीपॅडवर आगमन झाले. धर्मव्यासपीठावर त्यांचे स्वागत करण्यात आले असून लवकरच ते उपस्थितांना संबोधीत करणार आहेत.


Protected Content

Play sound