जळगाव (प्रतिनिधी) चैत्र महिन्यात खंडेराया यांच्या यात्रोत्सव आणि अक्षयतृतीयनिमित्त खान्देशात बारागाड्या ओढण्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. शहरातील जुने जळगाव भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही बारागाड्या ओढण्यात कार्यक्रम उत्साहात पार पडला. येळकोट येळकोट जयमल्हार , खंडेराव महाराज कि जय च्या जयघोषात हळदीचा भंडारा उधळत खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आज संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न झाला .
१४६ वर्षाची परंपरा या बारागाड्याना लाभलेली आहे .खंडेराव महाराज मूर्तीच्या अभिषेक पूजनानंतर संध्याकाळी बारागाड्यांची विधिवत पूजन झाल्यानंतर माजी भागत रामकृष्ण धनगर यांचे चिरंजीव भगत नाना रवींद्र धनगर यांनी तरुण कुढापा चौकापासून जुनी साधना शाळा येथील खंडेराव महाराजांच्या मंदिरापर्यंत बारागाड्या ओढल्या. तत्पूर्वी बारागाड्यांची विधिवत पूजन पोलीस पाटील प्रभाकर काशिनाथ पाटील व शनिपेठ पोलिसात स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेन यांच्या हस्ते करण्यात आली. शिवाजी पाटील, गिरीधर जावळे, शिरीष सरोदे गाड्या बांधण्याचे काम केले. . सादु काळे, दिनेश धांडे, अरुण मराठे, शेखर अत्तरदे, हेमराज खडके, प्रमोद नेमाने, भास्कर चौधरी, भानुदास चौधरी, तरुण कुढापा मंडळ यांचा सहभाग होता. बारागाड्याचा समारोप भाग्यलक्षमी चौक जुने गाव मित्रमंडळ येथे सांगता करण्यात आली. भगताचे बगले म्हणून राजू बारी व संजय कोळी हे होते तर दुसरं लावण्यासाठी अरुण मराठे व पंकज भावसार यांनी काम पहिले. सुमित पाटील, सुमित सपकाळे, शंभू भावसार, कुंदन चौधरी, शैलेश चौधरी, संदीप भावसार, सचिन चौधरी, प्रशांत सुनकर, पंकज भावसार आदींनी यस्वीतेसाठी परीश्रम घेतले.