जळगाव (प्रतिनिधी ) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या उत्तर महाराष्ट्रातील एम. एससी. मॅथ्स आणि बी. एससी अभ्यासक्रमासाठी मुक्त विद्यापीठाचे एकमेव अभ्यासकेंद्र असलेल्या हाजी नूर मो. चाचा ज्यू. कॉलेज जळगावमध्ये या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी अंजुमनचे आध्यक्ष अ. गफार मलीक होते. याप्रसंगी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे आध्यक्ष सिचन नारळे , बी. एड. कॉलेजचे माजीप्राचार्य डॉ. बी. ए. पटेल, दीपस्तंभ संचालक यजुर्वेद महाजन, विद्यालयाचे प्राचार्य शेख नईमोीन, दोंडाईचा सिनयर कॉलेजचे प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. डॉ. खैरनार आणि प्रा. सुनील हे प्रमुख पाहुणे हणून उपस्थित होते. याप्रसंगी अभ्यासकेंद्रावर मागील वर्षी बी . एससीमध्ये प्रथम आलेल्या सहर अता मसुद अखतर याविद्यार्थिनीचा व एम एससी मध्ये प्रथम आलेली अनीस फातेमा अ रजाक याविद्यार्थिनीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी यजुर्वेंद्र महाजन , बी. ए. पटेल, सचीन नारळे यांनी मार्गदर्शन केले. अ. गफार मिलक यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या ७७ वर्षाच्या इतिहास उजाळा दिला. संस्थेत सर्व स्तरातील, सर्व धर्माचे, संपूर्ण महाराष्ट्रातून, अभ्यासकेंद्रावर बी. एससी आणि एम एससीच्या शिक्षणासाठी विद्यार्थी येत असल्याचे सांगीतले. देशाला महासत्ता बनविण्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मुस्लिम समाज स्वातंत्र लढ्यात सर्वात पुढे होता त्याचे प्रमाणे देशाच्या प्रगतीसाठी समाज पुढे असेल अशी ग्वाही दिली. प्रास्तविक केंद्र प्रमुख डॉ. बाबू शेख यांनी तर सूत्रसंचालन मुख्तार यांनी आणि आभार डॉ. संजीव पाटील यांनी केले. यशवीतेसाठी जाकीर हुसेन, जाहीद हुसेन , तैयब , हबीब सर, आसीफ आदींनी कामकाज पहिले.