यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी व वर्धा येथे फार्मशी कॉलेजला प्राचार्य म्हणुन कार्यरत असलेले डॉ.भूषण कुमार साठे यांना नुकतेच नवी दिल्ली येथे ऐमिनेंट प्रिंसिपल फॉर या पुरस्काराने सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली येथे ७ सप्टेंबर रोजी झालेल्या एका भव्य अशा पूरस्कार वितरण सोहळ्यात गोल्डन ग्लोबल हेल्थ एंड एज्यूकेशनतर्फे इंडियन इस्लामिक कल्चर सेंटर येथे आयोजीत कार्यक्रमात अतुल नासा सहाय्यक ड्रग कंट्रोलर भारत सरकार, डॉ.पी. एल. साहु, संचालक राष्ट्रीय डोपींग लॅब मिनिस्टरी ऑफ युथ अॅण्ड स्पोर्ट, डॉ. विमल राहा ज्वाईंट संचालक एमएचआरडी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ भुषण कुमार साठे हे चिंचोली तालुका यावल येथील रहीवासी असुन वर्धा विदर्भ येथे प्राचार्य म्हणुन कार्यरत आहेत, त्यांना मिळालेल्या या सन्माना बद्दल डी वाय पाटील फार्मशी कॉलेज पुणे, यावल येथील माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आर.जी. नाना पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल वसंत पाटील, पत्रकार डी.बी. पाटील, सुनिल गावडे, प्रा.आर.ई. पाटील , देवकांत पाटील, वसंत गजमल पाटील, दिनकर सिताराम पाटील, यांच्यासहत्यांचे अनेकांनी शुभेच्छा देवुन त्यांचे अभीनंदन केले.