यावल प्रतिनिधी | येथील सरपंच परिषदची तालुका कार्यकारणीची अतिशय महत्त्वाची बैठक शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामध्ये (दि. २ डिसेंबर) गुरुवार रोजी आयोजीत करण्यात आली आहे.
दरम्यान, यावल येथे सकाळी दहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी सरपंच परिषदचे जिल्हा समन्वयक युवराज पाटील श्रीकांत पाटील आणि बाळू धुमाळ हे उपस्थित राहुन महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तरी याप्रसंगी यावल तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप प्रभाकर सोनवणे, उपाध्यक्ष भूषण नंदकिशोर पाटील, सय्यद असद अली सय्यद जावेद तसेच महिला तालुकाध्यक्ष कार्यकारणीच्या अलका पाटील यांनी केले आहे.