Home धर्म-समाज दुषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

दुषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा


yawal news 1

यावल प्रतिनिधी । शहरात होणारा दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून तो तत्काळ बंद करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा छत्रपती गृप बोरावलच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन दिले.

नगर परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख राजेंद्र देवरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील नळांना नगरपरिषदच्या माध्यमातुन मागील काही दिवसापासुन अत्यंत दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. नगर परिषदेने तात्काळ उपाययोजना करून नागरीकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे, अशा मागणीचे तक्रार निवेदन छत्रपती गृप बोरावल गेट यावलच्या वतीने विजय भोई, विजय शिर्के, ईश्वर भोई, सागर लोहार, भरत कोळी, विजय कोळी यांनी दिले.

आंदोलनाचा इशारा
शहरातील होणारा अत्यंत दुषित पाण्याचा पुरवठा न थांबल्पास छत्रपती ग्रुप यावलच्या माध्यमातुन तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख राजेंद्र देवरे यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.


Protected Content

Play sound