यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विहिरीतला गाळ काढण्यासाठी गेलेल्या मजुराचा अंगावर माती पडून दाबला गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील हिंगोणा शिवारात घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी. की हिंगोणा येथील राहणारा मुबारक रमजान तडवी वय ३२ वर्ष हा दिनांक १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी हिंगोणा येथील शेतकरी हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील गट क्रमांक९१७ मध्ये असलेल्या शेतातील विहीरीवर गळ काढण्याच्या कामासाठी गेला होता. रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास विहीरीवर काम करीत असतांना त्याच्या अंगावर माती पडून तो ढिगार्याखाली दाबला गेला. यातच मुबारक तडवी याचा मृत्यू झाला.
याबाबत शेतमालक हुना जयराम चोपडे यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून , पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे. मयत तडवी याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान, मयत मुबारक तडवी यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुल असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.