विवाहानंतर वधू ऐवज घेऊन फरार ! दलालांसह तरूणीविरूध्द गुन्हा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विवाह झाल्यानंतर काही दिवसांमध्येच घरातील दागिने व रोकड घेऊन पलायन केलेल्या वधूसह मध्यस्थांच्या विरोधात यावल पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील तरूणाची विवाह करतांना फसवणूक झाल्याचे प्रकरण घडले आहे. या संदर्भात संबंधीत तरूणाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, या तरूणाच्या विवाहासाठी त्याचे बर्‍हाणपूर येथील नातेवाईक अशोक सुधाकर जरीवाले, ( रा. महाजनापेठ, ब़र्‍हाणपुर, मध्यप्रदेश ) यांना लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे सुमारे सहा महीन्यांपुर्वी अशोक जरीवाले यांनी त्यांचे परीचयाची शिर्डी येथील महीला शिला साईनाथ अनर्थे पाटील, (रा. नांदुर्खी रोड, गणेशवाडी, मु.पो. शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर ) हिच्याशी आमचा परीचय करुन दिला. तेव्हा अशोक जरीवाले याने शीला पाटील हीस माझ्या लग्नाकरीता मुलगी दाखवण्याचे सांगितले होते.

यानंतर शिला पाटील हीने त्या तरूणाच्या वडीलांचे मोबाईल वर काही मुलींचे फोटो पाठविले होते. यातील माया संजय जोशी हीचा फोटो पसंतीस आला. यामळे त्या तरूणाीचा लग्नासाठी बघण्याचा कार्यक्रम ठेवण्याचे सांगितले. या अनुषंगाने त्यानंतर दि.१५/०१/२०२३ शिला पाटील, अशोक जरीवाले असे त्या तरूणाच्या घरी घर बघण्यासाठी आले होते. त्यावेळी शिला पाटील हिने माया जोशी हिचे सोबत लग्न ठरविण्यासाठी २,००,०००/- रुपये देण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे लग्नासाठी अँडव्हान्स म्हणुन त्याच दिवशी त्या तरूणाच्या वडीलांनी शिला पाटील हीस ५०,०००/- रुपये दिले होते. तर, उर्वरीत दीड लक्ष रूपये हेे लग्नाचे वेळी देण्याचे ठरले होते. त्यानंतर शिला पाटील व अशोक जरीवाले यांनी दि.२८ जानेवारी २०२३ रोजी अंबड, एम.आय.डी.सी. परीसरात रीलायबल कंपनीजवळ असलेल्या भागात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी शिला पाटील ही हजर होती. तिने ज्या घरात आम्हाला मुलगी दाखविली ते घर मुलीची आई व भाऊ प्रकाश संजय जोशी यांचे असले बाबत सांगितले होते. बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडल्यावर दोन दिवसांनंतर बर्‍हाणपुर येथे नोटरी करुन गायत्री संस्कार ट्रस्ट येथे लग्न करण्याचे ठरले.

या अनुषंगाने दि.३० जानेवारी रोजी बर्‍हाणपूर येथे सर्व जण गेले. त्यावेळी अशोक जरीवाले याने बर्‍हाणपूर येथील वकीलाया मार्फत वर व वधु पक्षाने स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन घेतली. यानंतर त्यांनी बर्‍हाणपुर येथीलच गायत्री संस्कार ट्रस्ट येथे जावुन हिंदु धर्म रीतीरीवाजाप्रमाणे लग्न केले. विवाह झाल्यानंतर शिला पाटील हीस लग्न लावण्यासाठी, उर्वरीत दीड लाख रूपयांची रक्कम त्या तरूणाच्या वडीलांनी दिली. यासोबत वधु मुलीचे अंगावर स्त्रीधन म्हणुन त्या तरूणाच्या कुटुंबाने सहा ग्रॅमचे सोन्याचे दागीने चढविले होते. लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या वेळी आम्ही घरी यावल येथे आले होते. त्यानंतर दि.०१/०२/२०२३ रोजी एक दिवसभर वधु माया जोशी ही व्यवस्थीत राहीली. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी रोजी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास माया हिला फालक नगरातील ब्युटी पार्लरमध्ये सोडले. तेथे वेळ लागेल म्हणून संबंधीत तरूण हा घरी गेला. यानंतर तो आपल्या पत्नीला घेण्यासाठी ब्युटी पार्लरवर घेण्यासाठी असता ती आधीच तेथून निघून गेल्याचे दिसून आले.

यानंतर संबंधीत तरूणाने आपल्या घरातील कपाट शोधले असता त्यांच्या घरातील कपाटातील पैसे शोधले असता कपाटातील ५०,०००/- रुपये रोख व सुमारे दिड तोडे सोन्याचे दाग दागिने लंपास करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर तो तरूण आणि त्याच्या कुटुंबियांनी अशोक जरीवाले व शिला पाटील यांना कॉल लावले असता त्यांनी उडवाउडविचे उत्तरे दिली. या अनुषंगाने संबंधीत तरूणाने माया संजय जोशी, अशोक सुधाकर जरीवाले, शिला साईनाथ अनर्थे पाटील, प्रकाश संजय जोशी, प्रकाश जोशी याची पत्नी यांच्या विरोधात यावल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content