यावल प्रतिनिधी | प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी यावल शहरात सामूहिक रक्षाबंधन साजरे करत शेकडो भगिनींकडून राखी बांधून घेतली.
येथे रक्षाबंधन या दिनाचे औचित्य साधुन भाऊ आणि बहिणीचे नांते हे त्यांचे निर्मल आणी पवित्र अतूट असे असते. याच नात्याचा उत्सव यावल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रविवारी असंख्य बहीणींच्या उपस्थित साजरा केला. रक्षाबंधन हा दिवस भाऊ-बहिणीच्या बंध हा प्रेमाचा नांव ज्याचे नांव राखी बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती ओवाळी ते प्रेमाने उजळुंनी दिपज्योती अशा भावपुर्ण वातावरणात हा प्रेमाचं प्रतीक म्हणुन या स्वरुपात साजरा केला जातो. यंदाचे रक्षाबंधन हे यावल शहरात सामूहिक स्वरूपात साजरे करण्यात आले.
याप्रसंगी प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांचे रावेर यावल तालुक्यातिल माता भगिनींनी राखी बांधून अतिशय आदराने व प्रेमाने माझे औक्षण केले. माझ्यासाठी यंदाचे रक्षाबंधन यामुळे विशेष झाले.. असल्याचे चौधरी यांनी सांगीतले. माता भगिनींची शक्ती सोबत असणे म्हणजे साक्षात आई जगदंबेचा आशीर्वाद सोबत असणे होय आज राखीच्या दरम्यान मला एक नाही दोन नाही तर आई जगदंबेच्या शेकडो रूपांचा आशीर्वाद आपणास मिळाल्याचे मनोगत या प्रसंगी अनिल चौधरी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ऍड. नंदनी अनिल चौधरी यांच्यासह मनोज करणकाळ , दिपक गुरव, सागर चौधरी , सुभाष पाटील , निलेश बारी , नितीन बारी , भिकन पाटील , नरेन्द्र माळी , पियुष देशमुख , सोनु बारी, सचिन चौधरी , तुकाराम बारी आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.