यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप बोरावल गेट यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सामान्य ज्ञान स्पर्धेचे पारितोषीक वितरण करण्यात आले.
शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप बोरावल गेट यावल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने यावल शहरातील सर्व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या होते. या सामान्य ज्ञान स्पर्धतील यश संपादन केलेल्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व स्मृतीचिन्ह देवुन गौरवण्यात आले.
यावल येथील साने गुरूजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयात शिवरत्न फाउंडेशन या सामाजीक संघटनेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांसाठीच्या सामान्य ज्ञान स्पर्धा पहीला गट ९ वी ते१० तर दुसरा गट ११ते १२ पर्यंत दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धत यावल शहरातील विविध शाळेतील सुमारे सहाशे विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी या आपला सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजीत पारित्तोषीक वितरण कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ. कुंदन सुधाकर फेगडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अतुल पाटील व डॉ कुंदन फेगडे, शिवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माळी( गोलु ), सचिव सागर कृष्णा लोहार, नरेन्द्र शिंदे व आदी मान्यवरांच्या हस्ते या प्रथम गट९वीत १ेपहीले बक्षीस मोहीत संजय शिंपी , व्दीतीय बक्षीस सोनल नितिन महाजन, तृतीय बक्षीस गायत्री शशीकांत चौधरी , उत्तेजनार्थ बक्षीस सविता ठाणसिंग बिलाला व सोहन प्रकाश माळी यांना देण्यात आले तर दुसर्या ११ते १२च्या प्रथम बक्षीस मानसी विश्वनाथ बारी , व्दितीय बक्षीस लिना किशोर सोनवणे , तृतीय बक्षीस वैष्णवी शांताराम बारी तर उत्तेजनार्थ बक्षीस नाहीद इकबाल तडवी व पुरूषोतम सुरेश कुंभार या यशस्वी १० विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह वितरीत करण्यात आली .
यावेळी अतुल पाटील व डॉ कुंदन फेगडे यांच्यासह आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संपुर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवरल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी महत्वाचे परिश्नम घेतले. यासाठी यावल शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुत्र संचलन महाविद्यालयाचे कला शिक्षक विजय नन्नवरे यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार यशोदीपचे संचालक उमेश धनगर यांनी मानले.