यावल येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

adhawa

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने लागु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कार्याला अनेक बैठकी घेवुनही पाहीजे तशी गती मिळत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज यावल येथे या कामाला तपशीलवार आढावा घेतला.

बैठकीला यांची होती उपस्थिती
यावल येथील तहसीलदार कार्यालयात आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात आयोजीत या बैठकीला कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, महसुलचे मंडळ अधिकारी आणी तलाठी या आढावा बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची तपशीलवार माहिती घेवुन ३० जुनपर्यंत उर्वरीत शेतकऱ्यांपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहोचला पाहीजे अशा सुचना दिल्यात, दरम्यान चिखली येथील ग्रामविकास अधिकारी तळेले आणि जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यात दूरध्वनी वरुन झालेल्या संभाषणातुन झालेला वाद हा चांगला चिघळला असुन, जिल्हाधिकारी यांनी चिखली गावाचे ग्रामविकास अधिकारी यांनी शिवीगाळ केल्याने आदीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामावर संपुर्ण कामावर ग्रामसेवकांच्या राज्य पातळीवरील संघटनेने बहीष्कार टाकल्याच्या विषयाधरून जिल्हाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी चिखली यांच्या शाब्दीक वाद पेटले असुन, संपुर्ण राज्यात या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या सर्व प्रकारनंतर देखील जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल महाजन यांच्यासह आदी अधिकाऱ्यांच्या पथकाने चिखली येथील कृषी सहाय्यकाचे काम पाहीले तसेच त्यांनी चिखलीच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. विद्यार्थांच्या शैक्षणीक गुणवत्तेची परिक्षा घेतली व चिमुकल्या विद्यार्थ्याशी आपुलकीने संवाद साधला, यावेळी उपस्थित चिखली गावातील ग्रामस्थांना जिल्हा परिषदच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगुन, आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घ्यावेअसे आवाहन त्यांनी या वेळी केले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बामणोद तलाठीच्या दफ्तराची आणी पाडळसा येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या दफ्तराची तपासणी केली व कामाचा आढावा घेतला.

Protected Content