यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समिती उपसभापतींसह सदस्यांनी आपापल्या पदाचे सामूहिक राजीनामे सभापतींना सुपुर्द केले आहेत.
याबाबत वृत्त असे की, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर घाला घालुन पंचायतराज मोडुन काढण्याचा प्रयत्न सध्याचे सरकार करत आहे. यामुळे पंचायत राज मोडकडीस आणण्यात येत असुन, पंचायत समिती सदस्यांना अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर मराठवाडयातील ३५४ पंचायत समिती सदस्य उपोषणाला बसले होते. या उपोषणास ३३ आमदार आणी विरोधी पक्षनेत्यांनी भेट दिली होती. ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सोबत चर्चा ही झाली होती परंतु काही निर्णय झाला नाही. तरी राज्यातील पंचायत समितीच्या सदस्यांचे संपुर्ण राज्यात सामुहीक राजीनामे देण्यात येत असुन, आज यावल पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत रामराव पाटील,पं.स. सदस्य शेखर सोपान पाटील, योगेश भंगाळे,कलीमा सायबु तडवी, सरफराज तडवी, दिपक पाटील, यांनी आपले पंचायत समिती सदस्य पदाचे राजीनामे सभापती सौ. पल्लवी पुरूजीत चौधरी यांच्याकडे दिले आहेत.
या पंचायत समिती सदस्यांना १४वा वितीय आयोग पुर्वी प्रमाणे तरदुत करावी. याच्याशिवाय मनरेगाच्या कामांची मंजुरी देण्याचा अधिकारी पंचायत समिती सभागृहाला देण्यात यावा अशा एकुण १५ मागण्यांच्या मान्यता मिळवण्यासाठी सर्वपक्षीय प. स. आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत.