यावल प्रतिनिधी | येथील पंचायत समितीची आजची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. यात गटनेते शेखर सोपान पाटील यांनी अधिकार्यांना धारेवर धरत कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
येथील पंचायत समितीची आजची सर्वसाधारण मासिक सभा विविध विषयांवरून वादळी ठरली असुन, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी सभेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करून सर्वांना धारेवर धरले. यावेळी जर सर्वसामान्याचे कामे या ठीकाणी होत नसतील व आपल्या हक्कांच्या कामासाठी त्यांना पंचायत समितीत वारंवार हेलपाटे खावे लागत असतील तर मग नागरीकांनी काय करावे असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.
दरम्यान आज दिनांक २४ रोजी यावल पंचायत समितीच्या सभागृहात सभापती सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली सर्वसाधारण सभा तालुक्याच्या विविध ज्वलंत प्रश्नाने व भ्रष्ठाचाराच्या विषयाने चांगलीच वादळी ठरली आहे . यावेळी पंचायत समितीतील कॉंग्रेसचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेतली. यात प्रामुख्याने चौदाव्या वित्तीय आयोगाच्या निधीचा मारूळ ग्रामपंचायतमध्ये झालेला गैरव्यवहार प्रकरणी होत नसलेली चौकशी , आमोदा ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक हे १४ व्या वित्तीय आयोगाच्या कामांचे दफ्तर देत नाही , घरकुल योजनांमध्ये झालेला घोळ , घरकुलांचे शेवटचे धनादेश मिळवण्यासाठी होणारे लाभार्थ्यांचे आर्थिक , आदीवासी पाडया वस्तीवरील वाढलेला कुपोषणग्रस्तांचा गंभीर प्रश्न या विविध प्रश्नांना घेवुन गटनेते शेखर पाटील यांनी गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील व ग्राम पंचायत विस्तार अधिकारी के. सी. सपकाळे यांच्या भोंगळ कारभारावर टीकास्त्र सोडले.
या सर्वसाधारण मासीक सभेस उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , पंचायत समिती सदस्य उमाकांत रामराव पाटील , दिपक पाटील ,सरफराज सिकंदर तडवी ,सदस्या कलीमा सायबु तडवी, लक्ष्मीताई विजय मोरे अशी सर्व सदस्य व विविध विभागातील सर्व अधिकारी वर्ग हे या सभेला प्रथमच मोठया संख्येने उपस्थित असल्याचे दिसुन आले.
दरम्यान गटविकास अधिकारी यांचे वचक नसल्याने व त्यांच्या सहकार्यांच्या यावल पंचायत समितीच्या होणार्या आर्थिक मोहापोटी भोंगळ व गलथान कारभारामुळे सर्व क्षेत्रात यावल पंचायत समिती ही पिछाडी पडली असल्याचे पत्रकारांशी बोलतांना पाटील यांनी सांगीतले. जळगाव जिल्ह्यात पंचायतराज समिती आली असुन, आपण या समितीकडे पुराव्यांनिशी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.