यावल (प्रतिनिधी)। येथील पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणुन कार्यरत असलेले एम.डी.नाना पाटील हे वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्याने पंचायत समिती मधून 31 मे रोजी आपल्या प्रदिर्घ सेवेतुन निवृत्त होत आहे. त्यांनी 30 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये सेवा केली आपल्या शासकीय सेवेची सुरुवात त्यांनी सर्व प्रथम धरणगाव तालुक्यातील साळवा येथे १९८६ मध्ये प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या शिपाई पदावरून सेवाकार्य केले नंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जळगाव येथे व धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सेवा केली.
गेल्या 15 वर्ष पासुन ते यावल पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत आस्थापना विभागात त्यांनी उत्कृष्ट सेवा केली. त्यांच्या प्रशासकीय सेवेचा कार्य त्यांचे सह कर्मचारी व अधिकारी यांच्या सदैव आठवणीत राहण्यासारखा आहे. यावल पंचायत समितीचा त्यांचे सेवानिवृत्ती निमित्ताने यावल पंचायत समिती प्रशासन व ग्रामपंचायत सर्व ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे 19 रोजी शुक्रवारी सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, असे यावल पंचायत समिती प्रशासन व ग्रामसेवक संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.