यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांची निवड ईश्वरचिठ्ठीने काढण्यात आली. यावेळी सभापतीपदी पल्लवी चौधरी तर उपसभापतीपदी दिपक पाटील यांची निवड करण्यात आली. यावल पंचायत समिती सभापती आणी उपसभापती पदाचे अडीच वर्षाचे कार्यकाळ पुर्ण झाल्याने दोन्ही पदाची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी निवड केली आहे.
यावल पंचायत समितीच्या विद्यमान सभापती म्हणुन भाजपाच्या मदतीने पल्लवी पुरूजीत चौधरी यांची तर ईश्वरीय चिठ्ठीद्वारे कॉंग्रेसचे उमाकांत रामराव पाटील यांची निवड झाली होती. यावल पंचायत समितीत भाजपाचे 5 काँग्रेसच सदस्य संख्या असतांना मंध्यातरी कालावधीत माजी सभापती संध्या किशोर महाजन यांना पक्षाविरूद्ध कार्य केल्याबद्दल आणि दुसऱ्या भाजपाच्याच पं.स.सदस्या लताबाई भगवान कोळी यांनी आपले जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी अपात्र करण्यात आले होते.
यावल पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाचे एकुण 4 सदस्य असुन यात उमाकांत रामराव पाटील, शेखर सोपान पाटील, सरफराज सिकंदर तडवी, कलीमा सायबु तडवी यांचा समावेश आहे, भाजपाचे दिपक नामदेव पाटील, योगेश दिलीप भंगाळे तिन सदस्य असुन विद्यमान सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी या अपक्ष म्हणुन निवडुन आल्या असुन त्या भाजपाच्या पाठींब्याने या सभापती आहेत. यावल पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महीला प्रर्वगासाठी आरक्षीत असल्याने विद्यमान सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी यांची पुनश्च सभापतीपदासाठी निवड निश्चित मानली जात होते. उपसभापती पदासाठी भाजपाकडुन दिपक नामदेव पाटील यांनी तर काँग्रेस पक्षाच्या वतीने शेखर सोपान पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज आजच्या विशेष सभेचे निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्याकडे दाखल केले. भाजपा आणी काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी चार असे संख्याबळ असल्याने पुनश्च उपसभापती पदाचीही निवड स्वस्तीक प्रकाश धनगर या विद्यार्थ्याच्या हस्ते ईश्वरचिट्टी व्दारे करण्यात आल्याने दिपक नामदेव पाटील यांची निवड झाली. या विशेष सभेला सर्व आठ सदस्य उपस्थित होते.