यावल प्रतिनिधी । शहरातील हडकाई नदीपात्रात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे ५ लाख ७६ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार आज दिनांक २२ जुन रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास हडकाई नदीच्या पात्रातच्या बाजुस असलेल्या मोकळ्या बखळ जागेत या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्डयावर धाड टाकली. यात जुगार साहीत्यासह विजय बंडु गजरे , शेख रसुल शेख लाल यावल , कडु वसंत झांबरे (रा .भुसावळ); धीरज पंडीत वारके (राहणार भुसावळ), चंदु राजु पारधे, शेख सलीम शेख फकीरा राहणार ( रा. यावल), विजय भानुदास पाटील (रा. भुसावळ) आणि रविन्द्र सिताराम भंगाळे सर्वाना या ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या सर्व संशयितांकडून १४ मोटरसायकलींसह रोख रक्कम ८० हजार रुपये रोख रक्कम ६ मोबाईल आदींसह ५ लाख ७६ हजार रुपये रोख या धाडीतुन जप्त केले आहे. या संदर्भात पोलीस कर्मचारी सुशिल रामदास घुगे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत सहाय्यक पोलीस निरिक्षक एस .एच .आखेगावकर, ( वाचक शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव ) पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यावल , पोहेकॉ प्रविण प्रल्हाद पाटील , पोहेकॉ जमिल अहमद खान, पोलीस नायक भुषण विनायक मांडोळे, पोकॉ रवीन्द्र रमेश पाटील,पोकॉ आसीफ शौकत पिंजारी यांनी या कार्यवाहीत भाग घेतला. दरम्यान पोलीसांनी टाकलेल्या जुगार अड्डयाच्या धाडी प्रसंगी काही जणांनी पळ काढल्याचे कळते.