चुंचाळेसह परिसराला वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा !

यावल, प्रतिनिधी । तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा चुंचाळेसह परिसराला बसलेला आहे. या वादळामुळे काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली  असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विविध ठिकाणी उभी असलेली केळी आडवी पडलेली आहे.

 

याबाबत सविस्तर असे की,  दि २९ रोजी चुंचाळेसह परिसरातील गावांमध्ये सायंकाळी  ६ वाजेपासून वादळाचा सुरुवात झाली तर जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळ सुरु होते.  या दरम्यान परिसरात खूप जोराने सोसाट्याचा वारा सुरू होता. वाऱ्याने गावातील व परिसरातील झाडे अक्षरश: हेलकावे खात होती. या वादळातील वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सकल भागात पाणी वाहून निघाले तर या वादळामुळे काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. यादरम्यान विद्युत पुरवठा ही खंडीत करण्यात आला होता. वादळा दरम्यान सुदैवाने कोणासही काही इजा झाली नाही.  कापणीवर आलेल्या संजुसिंग राजपुत या शेतकरी यांच्या शेतातील केळी पिकांचे देखील सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विविध ठिकाणी उभी असलेली केळी आडवी पडलेली आहे. या वादळामुळे परिसरातील शेतामधील केळी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. बऱ्याच ठिकाणी कापणीवर आलेली केळीचे झाडे अक्षरशः खाली जमिनीवर कोसळुन पडलेली आहे. अचानक आलेल्या वादळासह पावसामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी पिकास कसेबसे वाचवले. मात्र कालच्या वादळामुळे ही केळी जमीनदोस्त झालेली आहे. दरम्यान चुंचाळे सह परिसरात दि ३० रोजी भल्या पहाटे साडेतीन वाजे दरम्यान जोरदार अवकाळी पावसास सुरुवात झाली. जवळपास अर्धा तो पाऊण तास मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यावरून अक्षरशः पाणी वाहून निघाले तर मुख्य चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे. मात्र, अचानक झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे परिसरातीत केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Protected Content