यावल, प्रतिनिधी। तालुक्यातील ग्रामपंचायतीसह नगरपरिषद मधील दिव्यांगनिधी दिव्यांगाना त्वरीत मिळावा यासाठी येथील अपंग कल्याण व पुर्नवसन संस्थेच्या वतीने येथील तहसीलदार जितेंद्र कुवर व यावल नगर परिपदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे तसेच नगरपालीकेकडे असलेला ३ टक्के दिव्यांग निधीचे दिव्यांगाना आजपर्यंत वाटप झाले नाही हा निधी दिव्यांगाना त्वरीत मिळावा तसेच दिव्यांगाना मिळणारे ६०० रुपयाचे वेतन दरमहा नियमीत मिळावे यासह ज्यांना अंत्योदय योजनअंतर्गत शिधापत्रीका मीळालेल्या ओहत त्यांना दरमहा ३५ किलो अन्न-धान्य देण्यात योवे तर ज्यांचेकडे शिधापत्रीका नाही त्यांना त्वरीत अंत्योदय योजनेत सामावून घेूव त्यांना शिधापत्रीका वाटप कराव्यात निवदेनावर संसथेचे अध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी, चंदु वैराळे, वैशाली तेली, ममता पाटील यांच्यासह दिव्यांगाच्या सहया आहेत, यावेळी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल वसंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक प्रा. मुकेश पोपटराव येवले, नगरसेवक शेख अस्लम शेख नबी आदी उपास्थित होते.