यावल Yawal प्रतिनिधी । शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव आढळून आला असून एकाच कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
येथील शहरातील एका खाजगी वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले व एका मॉलचे संचालकांचे संपुर्ण कुटुंब हे कोरोना पॉझीटीव्ह निघाले आहे. त्या सर्व कुटुंबातील चार पुरूष आणि चार महीला असा एकुण आठ् कोरोना तात्काळ क्वारेंटाईन करण्यात आले आहे. तब्बल चार महीन्यांच्या विश्रांतीनंतर कोरोना विषाणु संसर्गाने शहरात प्रवेश केल्याने आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बर्हाटे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. यावल ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने तात्काळ त्या कोरोना बाधित कुटुंबाचे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले त्यांचे हॉस्पीटल आणी मॉल बंद केले आहे. बाधितांपैक्की एकास जळगाव येथील कोवीड सेन्टरला पाठवण्यात आले असुन इतर सात जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अघिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी सांगीतले.
दरम्यान, कोरोनाचे पूर्ण उच्चाटन झाले नसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
yawal Corona News, Yawal