यावल प्रतिनिधी । तालुक्यात विविध गावांमध्ये महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत दाखले वाटप करण्यात येत असून याला प्रतिसाद मिळत आहे.
महाराजस्व शिबीराची सुरुवात जिल्हा परिषदच्या शाळेत आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.या प्रसंगी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुंवर आदी मान्यवर उपस्थित होते. भालोद येथील न्यू इंग्लीश स्कूल च्या परिसरात संपन्न झालेल्या महाराजस्व अभीयान शिबीरात ग्रामस्थांना विविध प्रकार चे दाखले वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, कृषी भुषण कृषि उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक गणेश गिरधर नेहते, भालोद ग्रामपंचायत सरपंच मिनाक्षी चंदन भालेराव, उपसरपंच जाबीर खां समशेर खां, माजी सरपंच अरूण चौधरी, न्यु इंग्लीस स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन दिलीप हरी चौधरी यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या महाराजस्व अभियानात ग्रामस्थांना १७२ उत्पन्न दाखले, नॅशानिलीटी दाखले ६८, जातीचे दाखले ७४ तसेच डोनेशिअल दाखले ८ नॉन क्रिमीअर दाखले २७ असे एकुण ३४१ विविध दाखल्याचे वितरण आमदार हरीभाऊ जावळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे जि.एस . पाटील सुत्रसंचलन यांनी केले तर आस्थितांचे आभार महसुलच्या वतीने जितेन्द्र पंजे यांनी मानले. यावेळी शाळेच्या आवारात आमदार व संस्थेचे अध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.