यावल प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथील वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली झाली असली तरी येथील घरकुल घोटाळ्यासह अन्य प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील यांनी केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की नायगाव येथे १६ फ्रेब्रुवारी २०१६ ला ग्रामसेवक म्हणुन पी. पी. सैंदाणे हे नायगाव ग्रामपंचायतीला रूजू झाले होते. यानंतर त्यांनी काही जणांना हाताशी धरून मनमानी कारभार सुरु केला. या सर्वात गंभीर विषय म्हणजे आर्थिक स्वार्थापोटी गावातील मतदारांना सोडून बाहेरगावाहून आलेल्याना परप्रांतांच्या नांवावर घरकुल मंजुर करून दिले गेले. या संदर्भात तक्रारी झाल्यावर देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही यावल पंचायत समितीच्या दिसुन आती नाही.
दरम्यान हा सर्व प्रकार पाहुन ही मंडळी गप्प का होती. याचा अर्थ काय समजावा ? अलीकडच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही पारदर्शकता व स्वाभीमान जपणारे सदस्य निवडून आले आणि त्यांनी या सर्व आर्थीक गोंधळाचा आवाज उठवून गैरकारभारा विरुद्ध गटविकास अधिकारी, सिईओ, ग्रामविकास मंत्रालय आदींपर्यंत तक्रारी केल्या. आवाज उठवला.पण तरीही या महाशयांना वाचवण्यासाठी, ज्यांना या पासून फायदा होता असे महानग ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण शेवटी सत्य जिंकले. सत्याचा विजय झाला. फक्त बदलीने समाधान न मानता यांची चौकशी होवून शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून असे धाडस पुन्हा कोणी ही करणार नाहीत अशी संतप्त भावना ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामसेवकाची बदली झाली तरी घरकुलासह सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. तसेच या महाशयांना सहकार्य करणार्या धेंड्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्त रामदास पाटील यांनी केली आहे.