यावल (प्रतिनिधी)। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी यावल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यावल पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांनी ध्वजास शासकीय सलामी दिली.
यावेळी यावलचे पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी त्यांचे सर्व कर्मचारी, यावल तहसीलचे नायब तहसीलदार आर.के.पवार, बी.ई. पाटील, सिमा चव्हाण, विकास राठौर, के.एम. पंजे, संतोष पाटील, यांच्यासह महसुलचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर यावल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष सुरेखा कोळी, नगरसेवक दिपक बेहडे, मनसेचे संजय नन्नवरे, चेतन अढळकर, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी जे.एस. तडवी, शाखा अभियंता अजित निंबाळकर, सी.डी. तायडे, एस.ए. पाटील, यावल एसटी आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव, भाजपाचे शहराध्यक्ष हेमराज उर्फ बाळु फेगडे, किशोर कुलकर्णी, शिवसेनेचे जगदीश कवडीवाले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान आदी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावल पंचायत समिती कार्यालय
यावल पंचायत समितीच्या परिसरात पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, कक्ष अधिकारी बबन तडवी, एम.डी. पाटील, यांच्यासह जिल्हा परिषदच्या सदस्य नंदा दिलीप सपकाळे, जि. प. सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर यावल नगरपारिषदच्या आवारात जेष्ठ नागरीक व माजी सैनिक प्रभाकर शांताराम झोपे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी, नगर परिषदचे सर्व अधिकारी व कर्मचारी या ध्वजारोहणास उपस्थित होते.