यावल प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जे. टी. महाजन अभियांत्रीक महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील ऑक्सीजन प्रणालीला पंधरा हजाराची मदत धनादेश च्या रूपात दिली.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठलाही कार्यक्रम घेतला नाही. तसेच, फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी उपचारा अभावी रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी लोकसहभागातुन ऑक्सीजन सेन्टरची उभारणी केली आहे. त्यांनी दात्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत सेवाभावी उपक्रम राबवून आपण समाज हिताचे कार्यक्रम करावे या उद्देशांनी प्रभाकर सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरच्या ऑक्सीजन प्रणाली करिता पंधरा हजाराचा धनादेश तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नायब तहसीलदार यांना देण्यात आला.
यावेळेस आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, काँग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, साकळीचे गजेंद्र सोनार यांच्यासह इतर कार्यकर्ते या वेळेस उपस्थित होते.
त्यानिमित्त यावल तालुका खरेदी विक्री संघामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी कार्यकर्त्यांना आवाहान करून सांगितले की आपल्यावर प्रेम करणारी मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी हार गुच्छ न आणता मला कुठल्या प्रकारची भेटवस्तू न आणता कोविड सेंटरला आपआपल्या परीने मदत करा असे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले.