यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी गावातील ग्राम पंचायतच्या वतीने कोरोनाच्या प्रतिकारसाठी गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले.
माध्यमातुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महेलखेडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. संपुर्ण राज्य हे कोरोना महामारीच्या विळख्यात पडला असुन , जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचा संसर्गाचा मोठया वेगाने प्रसार होत असुन , कोरोनाची तिसरी लाट म येण्याची दाट शक्यता आरोग्य यंत्रणेकडुन व्यक्त करण्यात येत असुन याची तात्काळ दखल घेण्यात आली आहे.
महेलखेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शरीफा ताहेर तडवी, उपसरपंच सौ. माया पराग महाजन, ग्रामसेवक देवानंद सोनवणे तसेच ग्राम पंचायत सदस्य सौ. विजया निलेश महाजन, शमीना अनिस पटेल, सदस्य जयंत पाटील , अशोक तायडे, सामाजीक कार्यकर्ते पराग महाजन, ग्रामस्थ सुदाम पाटील दिनकर पाटील, राजमल पाटील, अमित महाजन, निखिल पाटील, बापु न्हावकार, फक्तु पटेल, अनिस पटेल, सुभान पटेल, रशीद पटेल , राजु तडवी, महेन्द्र पाटील आदी ग्रामस्थांनी उपस्थितीत महेलखेडी गावाच्या निर्जतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच शरीफा तडवी व उपसरपंच सौ माया महाजन यांनी महेलखेडी ग्रामस्थांनी कोरोना काळातील शासनाने लागु केलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे उगीच काहीही कारण नसतांना घराबाहेर फिरू नये घरात राहावे सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.