यावल प्रतिनिधी । येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या यावल ते भुसावळ या राज्य मार्गाची गेल्या काही दिवसापासुन ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने मार्गाची फारच दयानिय अवस्था झाली असल्याने वाहनधारकांना या सर्व प्रकारामुळे मोठा त्रास सोसावा लागत असुन, यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे गांर्भीयांने लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.
यावल ते भुसावळ हा सुमारे १७ किलोमिटरचा मार्ग असुन, यावल आणी तालुक्याच्या जनतेसाठी भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन आणि व्यापाराची मोठी बाजारपेठ व इतर राज्याच्या सिमेला जोडणारे हे मार्ग असल्याने या राज्य मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची नियमित मोठी वर्दळ असते. मात्र असे असतांना या मार्गाची वाताहात लागली असल्याने रस्त्यावर निर्माण झालेल्या मोठमोठया खड्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे अत्यंत जिकरीचे झाले असुन या अतिश्य खराब झालेल्या मार्गावर अनेक निरपराध वाहनधारकांनी या खडयांमुळे आपला जिव गमावला आहे. या मार्गाच्या अवस्थेते बद्दल व सार्वजनिक बांधकाम विभाग यावलच्या कार्यालयातील सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती नुसार या १७ किलोमिटर पैक्की १३ किलोमिटरच्या रस्ता नुतनीकरणासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला. आता या कामास लवकरच सुरुवात होईल अशी माहीती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्षात कुठल्याही मोठयाअपघाताची वाट न बघता तात्काळ या मार्गाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी असंख्य वाहनधारकांकड्रन करण्यात येत आहे.