भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या बाबा तुलसीदास उदासी वर्षी महोत्सवाची आज सांगता होत आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात संत बाबा तुलसीदास उदासी यांचा वर्षी महोत्सव सुरू आहे.शनिवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील ५६ बालकांचे मंत्रोच्चारात जनेऊ (उपनयन) संस्कार करण्यात आले. या धार्मिक विधीसाठीची संपूर्ण व्यवस्था बाबा तुलसीदास बाबा कालिदास उदासी आश्रमातर्फे करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेल्या समाज बांधवांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा तुलसीदास बाबा कालिदास उदासी आश्रमाचे त्रिलोक मनवानी, सुदामा कारडा, हरे नैनानी, जिंकू चेलानी, राजेश देसाई, ज्ञानचंद नैनानी, भगवानदास कुकरेजा, सुनील कारडा, अमर बालचंद, अर्जुन सुंदरा यांनी सहकार्य केले.
दरम्यान, वर्षी महोत्सवाची आज सांगता होत असून यात शबद किर्तन, अखंड पाठकसाहेब वाचनाची समाप्ती, दुपारी १ वाजता वर्षी उत्सव व महाभंडारा होणार आहे.