बापरे : वृध्दाचा बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील अंजाळे येथे ७२ वर्षाच्या वृध्दाने आजोळी आलेल्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घृणास्पद घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अंजाळे येथे माहेर असणारी एक विवाहिता ही आपल्या मुलांसह अलीकडेच माहेरी आली होती. २ ऑगस्ट रोजी ही महिला आपल्या आई-वडिलांसह भुसावळ येथे कामानिमित्त गेली होती. दरम्यान, घरीच अंगणात खेळणार्‍या तिच्या सहा वर्षाच्या मुलीला विश्‍वनाथ हरी तायडे (वय ७२) या वृध्दाने आमीष दाखवून त्याच्या घरात नेत अश्‍लील चाळे करून अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र बालिकेने आरडा-ओरडा करत तेथून पळ काढला. संबंधीत महिला ही आपल्या माता-पित्यासह घरी आली असता तिला मुलीने हा प्रकार सांगितला. मात्र समाजात बदनामी होईल या भितीने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. यानंतर संबंधीत महिला आपल्या मुलांना घेऊन सासरी निघून गेली.

दरम्यान, या प्रकाराची माहिती संबंधीत बालिकेच्या आप्तांना झाली. यातून एका नातेवाईकाने शनिवारी सकाळी चाईल्ड हेल्पलाईनला याबाबतची माहिती दिली. याची तातडीने दखल घेत हेल्पलाईनतर्फे जिल्हा समन्वयक अधिकारी भानुदास येवलेकर व वृषाली श्रीपाद जोशी यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पोलीसी कारवाईबाबत आश्‍वस्त केले. त्यांचे याबाबत समुपदेशन केले. यामुळे अखेर यावल पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली. यानुसार रात्री उशीरा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.

Protected Content