यावल प्रतिनिधी । 9 ऑगस्ट ९ जागतिक आदीवासी दिनानिमित्त आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदीवासी कोळी समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आवाहन आदीवासी कोळी समाजाचे जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले. यावल येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृह आज आदीवासी कोळी समाजाची तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
जागतिक आदीवासी दिन साजरा करण्याबाबत नियोजन करण्यात आले असुन, संभाजी पेठ येथील महर्षि वाल्मिक यांच्या प्रतिमेची पुजा करुन आदीवासी प्रकल्प कार्यलयात रॅली काढण्यात येवुन आदीवासी समाजाची रुढी पंरपरा नुसार सजीव देखावे साजरे करण्यात येणार आहे. यावेळी बापु कोळी, खेमचंद कोळी, किरण कोळी, प्रदिप सोनवणे, जितेद्र सपकाळे, नामदेव कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला यांची होती उपस्थिती
यावेळी माजी जि.प.सदस्य जनार्दन कोळी, पथराडे येथील संरपच प्रताप सोनवणे, राहुल तायडे, ग्रामपंचायत सदस्य धनराज सपकाळे, कैलास सपकाळे, बंडू कोळी, प्रमोद सोनवणे, अरुण कोळी, संजय नन्नवरे, अमर कोळी, सुधाकर सोळंके, गोकुळ तायडे, समाधान सोनवणे, गंगाराम तायडे, रतन सपकाळे, संदिप सोनवणे, लीलाधर सोनवणे, चिंधु कोळी, सुनिल सोनवणे, गणेश कोळी, यशवंत सपकाळे, पदमाकर कोळी, गजानन कोळी, नितीन कोळीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक व सुत्रसंचालन भरत कोळी यांनी केले तर आभार प्रमोद कोळी यांनी मानले.