Home Cities यावल यावलचा चिमुकला स्वराज गडे मंथन परीक्षेत झळकला; जिल्ह्यात तिसरा

यावलचा चिमुकला स्वराज गडे मंथन परीक्षेत झळकला; जिल्ह्यात तिसरा


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमधील इयत्ता तिसरी सेमीच्या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. स्वराज मंदार गडे याने २०२४-२५ या वर्षाच्या परीक्षेत ३०० पैकी २८० गुण मिळवून जळगाव जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला, तर राज्यस्तरावर त्याने अकरावा क्रमांक मिळवला आहे.

स्वराज गडे याला या यशासाठी यावल येथील बालसंस्कार शाळेच्या माजी शिक्षिका सौ. रोहिणी पाठक आणि चेतन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना महाजन आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच समाजातील मान्यवरांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. स्वराजच्या या यशामुळे शाळेचे नाव राज्यस्तरावर पोहोचले असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound