यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या ४६ सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. १८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता यावल तहसील कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीत होणार असून यासाठी महसुल प्रशासन सज्ज झाले आहे.
दरम्यान दि.१५जानेवारी २०२१ रोजी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतच्या ३७९ नवनिर्वाचीत सदस्यांच्या निवडीकरिता १६९ मतदान केंद्रांवर सरासरीने ७७.२१ टक्के मतदान झाले आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनीत बंद झाले आहेत. सोमवार दि.१८ जानेवारी रोजी यावल येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीत सकाळी १0 वाजेपासुन सुरु होणार असुन यासाठी एकुण ८ फेऱ्यांमध्ये मतदानाची मोजणी होणार असुन पहील्या फेरीत किनगाव बु ९ टेबल, डांभुर्णी ७ फेऱ्या, दुसरी फेरी मारूळ ६ टेबल आणी भालोद ग्रामपंचायत ८ टेबल व वढोदे प्रगणे यावल १ टेबल, ३री फेरी बामणोद ग्रामपंचायतची मतमोजणी ८ टेबलांवर तर हिंगोणा ग्रामपंचायतची मतमोजणी ८ टेबलवर होणार, ४थ्या फेरीत दहीगाव६ टेबल आणी सावखेडा सिम५ टेबलांवर तर अंजाळे ग्रामपंचायतची मतमोजणी ५ टेबलांवर होणार आहे.
५व्या फेरीत नायगाव ग्राम पंचायत मतदानाची मोजणी ७ टेबलांवर मोहराळे ५ टेबलावर, शिरसाड ४ टेबल, ६ व्या फेरीत डोंगर कठोरा ५ टेबल, आमोदे ५ टेबल कोळ्वद ४ आणी आडगाव१ नावरे १ टेबल , ७व्या फेरीत चिंचोली ग्रामपंचायतच्या मतदानाची मोजणी ५ टेबलांवर, अट्रावल ५ टेबल, कासवे ४ बोरखेडा बु१ टेबलावर, टाकरखेडा १ टेबल, ८ व्या फेरीत सांगवी बु४ कोरपावली ४ राजोरा ३ निमगाव ३ व वनोली २ टेबलावर मत माजणी होणार, ९ व्या फेरीतील मतमोजणीत सातोद ग्रामपंचायत ३ टेबल, मनवेल ३ वड्री खु ३ भालशिव ३ हंबड्री ३ आणी पिंप्रि१ टेबलावर मतमोजणी होईल, १oव्या फेरीत वढोदे प्रगणे सावदा ३ पिळोदे ३ उंटावद ३ डोणगाव३ विरोदे ३ टेबलांवर, ११ व्या मतमोजणीच्या फेरीत विरावली ३ पिंपरूड २ सांगवी खु३ कोसगाव ३ बोरावल खु३ तर शेवटच्या १२ व्या फेरीत दुसखेडा ३ महेलखेडी ३ टेबलांवर मतमोजणी होणार असुन एकुण १६ टेबलांवर मतमोजणी होणार असुन एकाटेबलावर ५ कर्मचारी असे एकूण ८o कर्मचाराऱ्यांचा मतमोजणीत सहभाग असणार आहे.
संपुर्ण मतमोजणीची प्रक्रीया निवडणुक निरिक्षक व शिरपुर चे प्रांत अधिकारी व्ही व्ही बादल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील , पुरवठा विभागाचे राजेश भंगाळे, अंकीता वाघमुळे , रविन्द्र माळी , दिपक भुतेकर, मुक्तार तडवी, रवीन्द्र मिस्त्रि, सुयोग पाटील आदी महसुल कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.