यावल प्रतिनिधी । तालुक्यात वाळु माफीयाने धुमाकूळ घातला असून, फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी २४ तासात दोन वाळु वाहतुक करणारी वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे वाळु माफीयामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत माहीती अशी की, प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी (दि.१७ जून) रोजी व आज (दि.१८ जुन) रोजी सकाळच्या सुमारास यावल पेये आयोजित पंचायत समितीच्या बैठकीस येत असतांना फैजपुर मार्गावर सांगवी बुर्दुक गावाजवळ वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहन क्रमांक (एमएच ३९ सी ८३९) हे वाहन वाळुची वाहतूक करीत असल्याचे आढळुन आले. हे वाहन शेख रशीद शेख लतीफ यांच्या मालकीचे असुन, प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी वाहनचालक अकील मोहम्मद शकील रा. यावल यास वाळू वाहतूकीचा परवाना मागितला असल्यास त्यात खाडाखोड असल्याचे आढळुन आले. यावर प्रांत आधिकारी थोरबोले यांनी तात्काळ कार्यवाही करून सदरचे अनधिकृतपणे वाळुची वाहतुक करणारे वाहन यावल तहसीलमध्ये जमा करण्यात आले आहे. शेख रशीद शेख लतीफ या वाहन मालकास तात्काळ दंडाची रक्कम सुमारे २ लाख ८० हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर, फैजपुरमध्ये देखील आज थोरबोले यांनी शहरात अनधिकृतपणे वाळूची वाहतुक करणारे ट्रक वाहन क्रमांक (एमएच ०६ बिडी ५८८८) याच्या वाहनचालक समाधान पाटील रा. किनोद ता. जिल्हा जळगाव यांच्या ताब्यातील प्रभाकर सखाराम सपकाळे रा.किनोद, ता.जि.जळगाव यांच्या मालकीच्या वाहनात ३ ब्रास वाळू अनाधिकृतपणे वाहतूक करतांना आढळून आल्याने त्यांच्या वाहनास फैजपुर पोलिसात जमा करण्यात आली आहे. त्यास २ लाख ६८ हजार २२४ रुपयांचे ठंड ठोठावण्यात येत असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहीती तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी दिली आहे.
तालुक्यात वाळु माफीयाने धुमाकुळ माजवुन घातला असून, या वाळु माफीया विरोधात प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे तलाठी व मंडळाधिकारी हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे निदर्शनास आले असून, वाळु तस्करांचे व महसुलच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे तर नाहीत ना? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडू लागला आहे.