यावल तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री ; कारवाईची मागणी

gutakha

यावल प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन राज्यात गुटखा बंदी असतांना परप्रांतातून गुटख्याची विविध वाहनांव्दारे व एसटीच्या छुप्यामार्गाने तस्करी केली जात असुन, संपुर्ण तालुक्यात सुमारे १० ते १५ लाख रुपयांच्या गुटख्याची विविध ठिकाणी खुलेआम सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, तालुक्यात शेजारी असलेल्या मध्यप्रदेश या राज्यातून चोरट्या मार्गाने काही खाजगी चारचाकी वाहनाने तर एसटी वाहनाने संपुर्ण राज्यात गुटखाबंदी असतांना देखील बेकाद्येशीर वस्तुची खुलेआम पानटपरी, किराणा दुकान काही हॉटेल्स व सार्वजानिक ठिकाणी सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे, महाराष्ट्र राज्यात २० जुलै पासुन ही गुटकाबंदी पुढील एक वर्षासाठी वाढवण्यात आली असुन, राज्यातील तंबाकुजन्य पदार्थ पान मसालामुळे लाखो तरुणांना कर्करोगाची लागण झाल्याचे वृत आहे. राज्यात गुटकाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी असतांना काही गुटका तस्करी सम्राट शेजारच्या मध्यप्रदेश या परप्रांतातुन खाजगी चारचाकी वाहने आणि एसटी महामंडळाच्या वाहनाने महिन्याला जवळपास १०ते १५ लाख रुपयांचा गुटका खुलेआम सार्वजनिक ठिकाणी या गुटक्याची विक्री होतांना दिसत आहे. एसटीव्दारे गुटका आणणाऱ्या वाहनचालक व वाहकांना गुटक्याच्या एका गोणी मागे 500 ते 1,000 रुपये दिले जात असल्याचे माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

हा सर्व प्रकार सर्वांच्या समोर घडत असतांना सर्व पातळीवर आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ असा प्रकार सुरू आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने काल शहरातील काही उघडयावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या काही हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा बजावल्या आहेत. ही कारवाई करीत असतांना अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष अधिकारी यांना शहरात एक ही दुकानावर गुटका विक्री करतांना मिळुन आले नाही. हे आश्चर्यकारक घटना असल्याची चर्चा संपुर्ण शहरात होत आहे. या बेकादाशीर गुटका वाहतुक करणाऱ्या वाहनधारका वाहन परवाना रद्द करण्यात येईल यासाठीचे अधिसुचना काढण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. असे झाल्यास मग एसटीव्दारे गुटक्याची वाहतुक करणाऱ्यांवर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येईल ते पहावे. तो पर्यंत आर्थिक लोभाला बळी पडलेल्या अधिकारी यांच्या आशिर्वादाने गुटक्याची बेकाद्याशीर वाहतुक व विक्रीचा व्यवसाय सुरूच राहणार असे बोलले जात आहे.

Protected Content